top of page

 “दिलीप जगतापांनी जागतिक रंगभूमीवर गाजलेल्या नोबेल पुरस्कार प्राप्त नाटककारांची (उदा. बेकेट, सार्त्र, झ्ने, शोएंका, दारीओ फो) बरीच नाटकं मराठीत अनुवादित केली आहेत. कोणतीही नाट्यसंहिता लेखकाच्या मनोभूमीला रुचलेली व आपल्या लोकभूमीत रुजलेली असावी असे त्यांना वाटत आले आहे. त्या कलाकृतीचा मालक वेगळा असला तरी त्या अनुभवाचा प्रेषित म्हणून अनुवादकाचे स्वतंत्र असे व्यक्तीमत्त्व असावे असे त्यांना वाटत असावे. त्यात दोन्ही भाषांना त्यांच्या संस्कृतीला जोडता येणारा समांतर असा पुल निर्माण झाला पाहिजे. कोणत्याही अर्थाने देशीभवनाची अस्मिता जन्मायला नको. वैश्विक वाटाव्यात एवढ्या दोन्ही संस्कृतींशी सरमिसळ व्हायला हवी. आपण बदल करून कलेचा आत्मा गमावत नाही आहोत, त्याला लोकस्थितीशी जोडताना आत्म्याचा अवकाश अधिक व्यापक करीत असतो असे दिलीप जगतापांना वाटत असावे. त्यांच्या नाटकांसंबंधी माझा एक अनुभव आहे: मी शेक्सपिअरच्या ‘ज्युलियस सीझर’च्या बऱ्याच मराठी संहिता वाचलेल्या होत्या. त्यावरून ते नाटक कळले असे वाटत नव्हते, पण दिलीप जगतापांचे ‘ज्युलियस सीझर’ वाचताना त्यातील क्रायसिस उत्तमपैकी आकळला होता. म्हणजे जगतापांनी मराठीत आपला अनुवाद पोहचवण्याचा आपला म्हणून एक मार्ग निवडलेला आहे. म्हणून त्यांच्यातील सर्जनशीलतेला मराठी मानसिकतेचा, येथील मातीचा स्पर्श झालेला आहे.”
दा. गो. काळे
कवी, समीक्षक, संपादक
 

चेहरामोहरा | चोर चोर चोर

SKU: CMH2026
₹399.00 Regular Price
₹340.00Sale Price
Quantity
bottom of page