top of page

“शेक्सपीअरच्या नाट्यसंपदेमध्ये ‘ज्यूलिअस सीझर’ हे एक अत्यंत महत्त्वाचे राजकीय नाटक आहे. सत्तासंघर्षातून होणारा विनाश हा त्याचा विषय आहे. राजकारणात विशेषतः सत्तेच्या राजकारणातील विलक्षण गुंतागुंत त्यातल्या व्यूहरचना, आयुधे शेक्सपीअरने ‘ज्यूलिअस सीझर’मध्ये समर्थपणे वापरली आहेत. वरवर पाहता है एक सूडनाट वाटते आणि ते तसे आहेही, पण त्याच्यापुढे त्याने एक मूलभूत पेचप्रसंगाला हात घातला आहे, राजकारणाला नैतिकतेचे अधिष्ठान असावे का? पण हे नाटक शेक्सपीअरच्या इतर नाटकांप्रमाणे एका व्यक्तीची शोकांतिका नाही त्यामुळे हे नाटक संहिता आणि प्रयोगातून बाहेर येवून वाचक आणि प्रेक्षक यांच्या मनात शिरून यात आपण नेमके कुठे आहोत याचा शोध घ्यायला भाग पाडते आणि हे दिलीप जगतापनी अमूक हेरले आहे.”
प्रा. अविनाश सप्रे
ज्येष्ठ समीक्षक

“दिलीप जगतापांचे ‘बुड बुड रे घागरी’ हे एक उपहासगर्भ विनोदी नाटक मी दिग्दर्शित केले हे नाटक तुम्हाला हसवतं, फसवतं, घडवतं अशा संहिता दिलीप जगतापांसारखा अवलिया नाटककारच लिहू शकतो ज्याची राजकीय, सामाजिक आणि मुळात ‘माणूस’ ह्या संकल्पनेची जाण अतिशय खोल आहे, दिलीप जगतापांचे नाटक हे कोणत्याही एका माणसाचं, समाजाचं, जातीचं, धर्माचं, जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं प्रतिनिधित्व करत नाही. ते उनाड आहे, ते वैश्विक आहे म्हणून भावना, विवेक आणि कल्पनाशक्ती जागरूक ठेवून पाहणाऱ्या प्रत्येकाला ते स्वतःचा अवकाश निर्माण करून देणारं आहे.”
राजू वेंगुर्लेकर
नाट्य दिग्दर्शक

“भवतालाच भान असलेला. काळ कवेत घेणारा लेखक. रंगमंचीय अवकाशात दिग्दर्शकाला अनेक शक्यता शोधायला लावणारा लेखक, जगतापांची नाटकं समाजकारण, राजकारण यांचं अचूक मिश्रण असतात. ती तुम्हाला विवेक आपसूकच प्रदान करतात. मराठी रंगभूमीवरील दिलीप जगताप हा महत्त्वाचा आणि दुर्लक्षित ठेवलेला लेखक आहे.”
अभिजित झुंजारराव
नाट्य दिग्दर्शक
 

ज्यूलिअस सीझर

₹199.00 Regular Price
₹179.00Sale Price
  • DRAMA (Marathi)
    ISBN 978-93-84109-67-7
    Hardcover
    120 pages
    216 mm × 140 mm
    June 2021

bottom of page